बुद्धिप्रामाण्यवादातील प्रामाण्याचे निकष
नवभारत मासिकाच्या नोव्हेंबर १९८२ च्या अंकात प्रा. मे.पुं. रेगे ह्यांचा ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा लेख प्रकाशित झाला होता. प्रस्तुत अंकासाठी ह्या लेखावरील प्रतिवाद आला तेव्हा, मूळ लेखही सोबतच पुनर्प्रकाशित करावा असे वाटले. असे केल्याने वाचकांची मूळ विचारांशी ओळख होईल आणि ह्या प्रतिवादातील संदर्भदेखील लक्षात येतील. सर्वप्रथम rationalism ह्या शब्दाने ज्या दोन उपपत्ती संबोधल्या जातात त्याबद्दल लिहिणे इथे …